– हेमंत कर्णिक
दरवर्षी ठराविक दिवसांत होणार्या या सांस्कृतिक उत्सवाबद्दल गोवेकरांचं काय म्हणणं आहे, माहीत नाही; पण असंख्य चित्रपटप्रेमींसाठी गोव्याला येऊन जगभरातून निवडलेले चित्रपट बघणे, हा एक एखाद्या तीर्थयात्रेसारखा धार्मिक अनुभव असतो. जे समाधान भाविकाला तीर्थयात्रा करून मिळतं, त्याच जातीचा आनंद सिनेप्रेमींना ‘इफ्फी’ला येऊन मिळत असतो.
काही वर्षांपूर्वी निर्णय झाला आणि गोवा हे ‘इफ्फी’चं कायमचं ‘घर’ झालं. दरवर्षी ठराविक दिवसांत होणार्या या सांस्कृतिक उत्सवाबद्दल गोवेकरांचं काय म्हणणं आहे, माहीत नाही; पण असंख्य चित्रपटप्रेमींसाठी गोव्याला येऊन जगभरातून निवडलेले चित्रपट बघणे, हा एक एखाद्या तीर्थयात्रेसारखा धार्मिक अनुभव असतो. जे समाधान भाविकाला तीर्थयात्रा करून मिळतं, त्याच जातीचा आनंद सिनेप्रेमींना ‘इफ्फी’ला येऊन मिळत असतो.
जागतिक सिनेमा बघण्यात अलीकडच्या काळात एक भला मोठा फरक पडला आहे. नेटफ्लिक्स, हॉटस्टार यांसारख्या सुविधांमुळे एकेकाच्या अभिरुचीला जुळतील असे अनेकानेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मग खास ‘इफ्फी’ला येण्याचं प्रयोजन काय? याचं सरळ उत्तर असं, की इंग्रजी भाषेच्या पलीकडे जो चित्रपटकलेचा महासागर पसरला आहे, त्याची झलक अशा आंतरराष्ट्रीय महोत्सवातच मिळते. जगभरातून निवडलेले चित्रपट इथे त्यांच्या अनसेन्सॉर्ड स्वरूपात बघायला मिळतात. पण याचमुळे अशा उत्सावाकडून काही अपेक्षा निर्माण होतात. एक म्हणजे, चित्रपट महोत्सवातले चित्रपट वेगळे असावेत. हा वेगळेपणा कथाविषयापासून तंत्रापर्यंत कुठेही असू शकतो. हे चित्रपट ‘प्रामाणिक’ असावेत. म्हणजे त्यात दिसणारं चित्र वास्तवाशी जवळीक सांगणारं असावं. मुख्य धारेतले हिंदी चित्रपट बघून भारतातली कुटुंबव्यवस्था, इथलं कॉलेजजीवन वगैरेंबद्दल भारताची माहिती नसलेल्या एखाद्याचं काय मत होईल? तसं या चित्रपटांनी करू नये. अभिनय बरा आहे की वाईट, हा मुद्दाच या चित्रपटांमध्ये उपस्थित होऊ नये. कारण अगदी अपरिचित वातावरणातली गोष्ट पाहताना जे दिसतं ते तसंच असतं, असं धरून चालणं चुकीचं ठरू नये. आणि शेवटी, या चित्रपटांनी काहीतरी टिकाऊ ठसा मनावर उमटवावा. जाताना काही प्रमाणात समृद्ध झाल्यासारखं, स्वतःच्या विचारपद्धतीत थोडी जास्त समंजसता आल्याचा भास व्हावा.
तर, या वर्षी या अपेक्षा किती प्रमाणात पुर्या होताहेत, हे तपासण्याचं काम आता करायचं आहे.
महोत्सव सुरू झाला तो माजिद मजिदी या ख्यातनाम इराणी दिग्दर्शकाच्या भारतात घडणार्या इशूेपव ढहश उर्श्रेीवी या चित्रपटाने. यातले हिंदी संवाद विशाल भारद्वाज या इथल्या नावाजलेल्या दिग्दर्शकाने लिहिले आहेत. या चित्रपटाने अनेक पातळ्यांवर निराशा केली. डॅनी बॉईल या दिग्दर्शकाने ‘स्लमडॉग मिलिओनर’ हा चित्रपट काढताना दाखवलेला चतुरपणासुद्धा या चित्रपटाला जमलेला नाही. संपूर्ण चित्रपट भडक आहे. यामागे भारतीय जनमानसासाठी भावना आणि घटना भडकपणे दाखवाव्या लागतात, असं दिग्दर्शकाचं म्हणणं असू शकतं; पण शेवटी त्याला काही संवेदनशील म्हणणं मांडायचं होतं असं अजिबातच वाटलं नाही.
भारतीय चित्रपट काढताना भारतीय वास्तवाचा थोडा तरी अभ्यास दिग्दर्शकाने केलेला असावा, ही अपेक्षा वावगी म्हणता येणार नाही. पण इथे मुंबईत घडणार्या कथेत होळीच्या अगोदर आणि नंतर प्रचंड गडगडाटासह पाऊस पडतो. शहराच्या दक्षिण भागात असणार्या महालक्ष्मी परिसरात ऑटोरिक्षा थेट जाते. ‘मुंबई हॉस्पिटल’ नावाचं एक मध्यम आकाराचं हॉस्पिटल असतं. मुंबईतल्या एका भागातून दुसर्या भागात लोक बोटीने जातात. हे झालं भौगोलिक.
मुंबईतला गरीब मुलगा दोन खोल्यांच्या घरात राहतो आणि आणखी एक चिंचोळी खोली केवळ कबुतरांसाठी असते! गरीब मुलगा ड्रग्ज विकणे, मुलीने शरीरविक्रय करणे आणि त्यांना बर्यापैकी इंग्रजी बोलता येणे, या अत्यंत ढोबळ गोष्टींवरून सरळ कळतं की ‘तिसर्या’ जगातील गरिबीचं जे ठोकळेबाज चित्र बहुतेक पाश्चिमात्त्य जनमानसात वसत असतं, तेच माजिदीने स्वीकारून या फिल्मवर लादलं आहे. हा बेजबाबदारपणा आहे, आळस आहे आणि यात देशाचा अपमानही आहे.
महोत्सवात अनेक ठिकाणी अनेक चित्रपट एकाच वेळी चालू असतात. त्यातले काही जरी पुन्हा दाखवले जात असले, तरी सगळे चित्रपट बघून होणे एका माणसाला अशक्य असतं. म्हणजेच, जे बघायला मिळाले त्यांच्याविषयीच मत मांडता येतं. आतापर्यंत पाहिलेल्या (इशूेपव ढहश उर्श्रेीवी सोडून) नऊ चित्रपटांमध्ये ‘ठशर्वेीलींरलश्रश’चा अव्वल नंबर लावावासा वाटतो. हा चित्रपट आपल्याला गोदार्द या ख्यातनाम फ्रेंच दिग्दर्शकाची गोष्ट सांगतो. काळाच्या पुढे मानला गेलेल्या गोदार्दने त्याचे महत्त्वाचे चित्रपट बनवून झाल्यावर ही गोष्ट सुरू होते! त्याच्या तुडुंब प्रेमात असलेल्या एका एकोणीस वर्षे वयाच्या मुलीशी तो लग्न करतो आणि बहुतेक गोष्ट तिच्याच नजरेतून मांडली जाते. फ्रान्समध्ये अध्यक्ष द गॉल यांच्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी केलेल्या उठावात स्वतःला मार्क्सवादी मानणारा गोदार्द उत्साहाने सामील होतो आणि मग एकेका टप्प्यावर त्याला चित्रपटकला आणि मार्क्सवाद यांच्यातल्या खर्या-खोट्या विरोधाला सामोरं जावं लागतं. बुद्धिमान असण्याबरोबर संवेदनशीलसुद्धा असणार्या गोदार्दला ही सर्कस कठीण पडते. पण विचार आणि वर्तन यांच्यात विरोध होऊ न देण्याइतकी सचोटी अंगी असलेला गोदार्द एका बाजूने जवळच्या सगळ्यांचा आणि स्वतःचादेखील बौद्धिक छळ करू लागतो.
एका परीने प्रामाणिक कलावंताच्या मानसिक आंदोलनाला प्राधान्य देणार्या या चित्रपटाची पार्श्वभूमी जरी तरुणांच्या उठावाची असली; तरी गोदार्दच्या जीवनात खूप काही घडतंय असं नाही. जे आहे ते बहुतांश बौद्धिक आहे. तरीही या चित्रपटाला उत्तम वेग आहे. तो प्रेक्षकांचं लक्ष पकडून ठेवतो आणि नरमविनोदी शैलीतून बौद्धिक ओढाताणीचं नेमकं चित्रण करतो. तसं करताना निवेदन गोदार्दचं समर्थन करत नाही की त्याला आरोपीच्या पिंजर्यात उभा करत नाही. आडमुठा गोदार्द पहिल्यापासून शेवटपर्यंत तसाच राहत असला तरी त्याच्या सान्निध्यामुळे त्याच्या बायकोत होणारा बदल नीट लक्षात येतो.
दोन वर्षांपूर्वी पदकविजेता ठरलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या ‘र्ङेींशश्रशीी’ या कलाकृतीने निराशा केली नाही. आधुनिक जगतात स्त्रिया आणि पुरुष अधिकाधिक आत्मकेन्द्री होत जातात आणि प्रेम करण्याची क्षमता गमावून बसतात, याचं चित्रण हा चित्रपट करतो. एकमेकांपासून स्वतंत्र होण्याच्या स्थितीत असलेल्या एका जोडप्याचा शाळकरी मुलगा घरातील वातावरण असह्य होऊन पळून जातो. तो घरात नाही, हे लक्षात यायलाच त्यांना एक दिवस लागतो. मग त्याचा शोध सुरू होतो. आंद्रे जवाइगिनसेव या दिग्दर्शकाचं वैशिष्ट्य म्हणजे तो माणसामाणसांतले ताणतणाव जसे अगदी थोडक्यात अगदी अचूक मांडतो; तसंच माणसांच्या सभोवतीची निसर्गचौकट मांडून कथानकाला एक विशाल परिमाण प्रदान करतो. ही त्याची क्षमता या चित्रपटात नीट दिसून येते. ‘हे लोक प्रेम देण्या-घेण्यात पूर्णपणे बिनकामाचे झाले आहेत’ या सुस्पष्ट निर्देशाबरोबर आधुनिक माणसाची सुखाची कल्पना, त्याचं निसर्गापासून दुरावलेपण अशा गोष्टींचीसुद्धा दाखल घेतली जाते.
‘डलरषषेश्रवळपस’ या चित्रपटातल्या मुलाची बुद्धी ज्या दिशेने चालते, ते त्याच्या मित्रांना, शिक्षकांना, त्याच्या बापालाही कळत नाही. एक शिक्षक त्याला समजावून घ्यायचा प्रयत्न करतो. पण मग अशा मुलाचं काय होतं, याची ही गोष्ट आहे. मात्र ती इलियनेशनच्या रस्त्याला जात नाही. तो धडपडून वास्तव जगाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत राहतो आणि तसं करताना स्वतःची संवेदना न सोडता समोर येतील त्या परिणामांना तोंड द्यायची तयारी ठेवतो. एकंदर समाधानकारक सिनेमा.
भारतीयांसाठी ‘परदेश’ म्हणजे समृद्ध, परिपूर्ण अमेरिका आणि पश्चिम युरोप. इथल्या शिकल्यासवरलेल्यांना ते समृद्ध जग एक प्रकारे परिचयाचं असतं. पूर्व युरोप आणि आशिया हे सांस्कृतिकदृष्ट्या आपल्याला जवळचे. दक्षिण अमेरिकेचीसुद्धा बरीच माहिती इथल्या सुशिक्षितांना असते. पण आफ्रिका खंड आपल्याला अपरिचित. तिथली सांस्कृतिक मूल्यव्यवस्था, तिथल्या लोकांची मानसिकता यांविषयी आपलं अज्ञान गाढ आहे. त्यामुळे कॉंगोत घडणार्या ऋशश्रळलळींश या कथेचा थांग लागतो असं ठामपणे म्हणता येत नाही. एका सर्वसामान्य बारमध्ये गाणार्या गायिकेच्या मुलाला अपघात होतो आणि पुढच्या उपचारांसाठी तिला मोठ्या रकमेची गरज निर्माण होते. ती ती कशी उभारते, मुलगा आणि ती पुन्हा कसे सामान्य जीवन जगू लागतात, याची ही गोष्ट. यात आपल्याला तिथल्या बकालीचं जसं दर्शन घडतं, त्याबरोबर तिथल्या समाजातली उतरंडही दिसते. ही गोष्ट ‘आईची’ आहे, असं म्हणता येत नाही. कारण त्यात तिच्या मनोविश्वातले विविध संदर्भ येत राहतात. काळोख दाटतो, जंगल वेढून टाकतं, पाणी गिळंकृत करू बघतं आणि यातल्या काही चिन्हांचा, संकेतांचा थांग लागतं नाही. नाच, दारू आणि मुक्त शरीरसंबंध हे तिथल्या सामान्य जगण्याचे सामान्य घटक आहेत का? या प्रश्नाचं उत्तर द्यावंसं वाटत नाही. आपल्या इथला वाटावा असा एक प्रसंग आहे, ज्यात पळून चाललेल्या भुरट्या चोरांना लोक रक्तबंबाळ होईपर्यंत मार देतात आणि रस्त्यावरून चालणार्या इतरांना त्यात हस्तक्षेप करावासा वाटत नाही.
तरी या चित्रपटामध्ये तंत्राचा वापर होता. शब्द बाजूला ठेवून दृश्यामधून आशय पोहोचवण्याचा प्रयत्न स्पष्ट होता. हा निश्चितपणे ‘फेस्टिव्हलचा सिनेमा’ होता.
नेमक्या याच अर्थी ‘ढहश छळश्रश कळश्रींेप खपलळवशपीं’ हा चित्रपट फेस्टिव्हलचा सिनेमा नव्हता. हॉटेलमध्ये एका तरुणीचा खून होतो, इथून सुरू होणार्या या कथेमधून इजिप्तमधल्या सर्वंकष भ्रष्टाचाराचं दर्शन घडतं. पण परमेश्वराप्रमाणे सर्वव्यापी असणार्या भ्रष्टाचाराची गोष्ट सांगताना बाहेरच्या कशाचीच फूटपट्टी न पुरवल्याने सगळी पात्रं नियतीशरण वाटू लागतात आणि तशी तर ती वागत नाहीत. परिणामी, ही केवळ एक थ्रिलरकथा राहते. सगळेजण सतत सिगारेट ओढत राहतात, हे प्रचंड जाणवतं. का ओढतात? सामाजिक तणावाला सहन करण्यासाठी, की तिथे धूम्रपान हे स्मार्टपणाचं अविभाज्य लक्षण आहे?
‘एश्रेप वेशीप’ीं लशश्रळर्शींश ळप वशरींह’ हीसुद्धा फेस्टिव्हल फिल्म. बायको नाहीशी झाल्यावर तिचा शोध घेणार्या एलानची ही कहाणी. रिकाम्या कॉरिडॉरमधून, न संपणार्या जिन्यांवरून, भकास इमारतीतून चालत राहणार्या एलानची पाठ आपल्याला सारखी दिसत राहते. असह्य होण्याइतकी. अतिशय खिन्न वातावरणात चालणार्या या कथानकात एक झगझगीत बाई नाचताना दिसते आणि एक अगदीच उघडं असं संभोगदृश्य आहे. या दोन दृश्यांमुळे एकूण चित्रपटातली खिन्नता ठळक होते. एका बाजूने कंटाळवाणा ठरणारा हा चित्रपट या माध्यमाला जवळून भिडतो, असंही म्हणता येईल.
‘डलरीू चेींहशी’ हीसुद्धा एक चमत्कारिक कथा आहे. एक बाई लिहिते. तिचं लिखाण नवर्याला इतकं खटकतं की तो ते जाळून टाकतो. मग ती संसार सोडून लिखाणाच्या मागे जाते. मनगटावर लिहून ठेवण्याची तिला सवय असते. रिसर्च म्हणून ती एकाचा पाठलाग करते आणि तो जे काही करतो त्याची नोंद घेते. तिला बाथरूममधल्या टाईल्सवर काहीबाही दिसतं. शेवटी तिचा बाप आरोप करतो की तिला कल्पनाशक्ती नाही आणि लहानपणापासून तिला डायर्या लिहिण्याची सवय होती, तेच तिचं लिखाण आहे. पण तेव्हा त्या बापातच तिला लिखाणाचा शेवट सापडतो.
या चित्रपटातल्या बर्याच गोष्टी पटल्या नाहीत. एक प्रकारे याला फसलेला प्रयोग म्हणता येईल. पण एक प्रयोग फसला म्हणून कोणी प्रयोग करणं सोडून देत नाही. तसं करायचं असतं तर त्या दिग्दर्शकाने व्यावसायिक सिनेमे नसते का काढले?
‘णपुरपींशव’ ही एका आई-मुलाची कहाणी. कोसोवोमधून पळालेल्या तिला ऍमस्टरडॅममध्ये स्थैर्य लाभलेलं असतं आणि मुलाची मैत्रीण नेमकी सर्बियन निघते. मग तिच्यावर युद्धकाळात सर्बियन पुरुषांनी केलेल्या अत्याचाराच्या आठवणींवरची खपली निघते. त्या निर्वासित मुलाला कुठेच ‘आपला देश’ सापडत नाही. या गोष्टीला हा मुद्दा होता असं वाटलं तरी तो स्पष्टपणे उठून दिसला नाही.
महोत्सवातला सिनेमा मुख्य धारेपेक्षा कसा वेगळा असतो, हा विषयसुद्धा इथे घ्यायला हवा.