महोत्सवांमुळे राज्यातील साधनसुविधांवर ताण येणार

0
25

चालू ऑक्टोबर महिन्यापासून राज्यात पर्यटन मोसम सुरू झालेला असून आता राज्यात एकापाठोपाठ एक असे मोठे महोत्सव होणार आहेत. त्यामुळे राज्याच्या साधनसुविधांवर कधी नव्हे एवढा ताण पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यापूर्वीच राज्यात सुरू झालेल्या असून 26 ऑक्टोबर रोजी ह्या क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर होणार आहे. दि. 26 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या सोहळ्याचे उद्घाटन होणार असल्याने सदर दिवशी वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्रीडा स्पर्धा पाठोपाठ 20 नोव्हेंबरपासून राज्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होणार आहे. इफ्फीनंतर जानेवारीत आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाचेही आयोजन होणार आहे. या महोत्सवांमुळे राज्यातील वाहतूक तसेच अन्य साधनसुविधांवर मोठा ताण पडण्याची शक्यता आहे.