डचोली येथील नवचैतन्य सौस्कृतिक मंडळ व पिपळेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित अखिल गोवा कॅरम स्पर्धेत महेश नाईक तर संदेश गाड व सहकारी विजयी ठरले. वडाचा वाडा बोर्डे येथे आयोजित या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला.
एकेरी गटात ईश्वर पाल उपविजेता तर गोविंद गोसावी, नागेश पिळगावकर यांनी तिसरे व चौथे बक्षीस पटकावले दुहेरीत सहकारी यांनी उपविजेते पद पटकावले ,तसेच नागेश पिशगावकर व सहकारी व अनिकेत काणेकर व सहकारी यांनी तिसरे व चौथे बक्षीस पटकावले बक्षीस वितरण समारंभास आमदार राजेश पाटणेकर, माजी आमदार नरेश सावळ, नगरसेवक गुरुदत्त पळ, मेधा बोर्डेकर, चंद्रा माळगावकर, गोविंद गोसावी, उदय पळ, गोकुळदास हरमलकर, रमेश मोरजकर, जगदीश पालेकर, विराज गोसावी, आना पेडणेकर व भीमाकर पळ आदी उपस्तित होते. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.