महेंद्रसिंग धोनी, विराटकडे कर्णधारपद

0
129

>> ‘क्रिकइन्फो’चा दशकातील सर्वोत्तम संघ जाहीर

क्रिकइन्फो या क्रिकेटसंबंधीच्या लोकप्रिय संकेतस्थळाने मागील दशकातील आपल्या सर्वोत्तम एकदिवसीय, टी-ट्वेंटी व कसोटी संघाची घोषणा केली. वनडे व टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनी याच्याकडे सोपविण्यात आले असून विराट कोहलीला कसोटीसाठी कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे.
२३ सदस्यीय पथकाने सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली. किमान ५० कसोटी किंवा सहा वर्षे सक्रीय (कसोटी), ७५ वनडे, १०० टी-ट्वेंटी सामने हा निकष ठेवून संघांची निवड करण्यात आली आहे.

क्रिकइन्फो कसोटी संघ ः ऍलिस्टर कूक (इंग्लंड, ८८१८ धावा), डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया, ६९४७ धावा), केन विल्यमसन (न्यूझीलंड, ६३२२ धावा), विराट कोहली (भारत, ७२०२ धावा), स्टीव स्मिथ (ऑस्ट्रेलिया, ७०१३ धावा), बेन स्टोक्स (इंग्लंड, ३७३८ धावा, १३७ बळी), एबी डीव्हिलियर्स (द. आफ्रिका, ५०५९ धावा, ८० झेल), रविचंद्रन अश्‍विन (भारत, ३६२ बळी), जेम्स अँडरसन (इंग्लंड, ४२७ बळी), डेल स्टेन (द. आफ्रिका, २६७ बळी), रंगना हेराथ (श्रीलंका, ३६३ बळी)
क्रिकइन्फो आंतरराष्ष्ट्रीय वनडे संघ ः हाशिम आमला (द. आफ्रिका, ७२६५ धावा), रोहित शर्मा (भारत, ७९९१ धावा), विराट कोहली (भारत, ११०३६ धावा), एबी डीव्हिलियर्स (द. आफ्रिका, ६४८५ धावा), रॉस टेलर (न्यूझीलंड, ६४२८ धावा), महेंद्रसिंग धोनी (भारत, ५६४० धावा, १७० झेल, ७२ यष्टिचीत), शाकिब अल हसन (बांगलादेश, ४२७२ धावा, १७७ बळी), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड, १६४ बळी), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया, १७२ बळी), लसिथ मलिंगा (श्रीलंका, २४८ बळी), इम्रान ताहीर (द. आफ्रिका, १७३ बळी).

क्रिकइन्फो टी-ट्वेंटी संघ ः ख्रिस गेल (वेस्ट इंडीज, १२२८९ धावा), सुनील नारायण (वेस्ट इंडीज, २२४१ धावा, ३७९ बळी), विराट कोहली (भारत, ८००० धावा), एबी डीव्हिलियर्स (द. आफ्रिका, ७१६३ धावा), महेंद्रसिंग धोनी (भारत, ५३९६ धावा, १५४ झेल, ७७ यष्टिचीत), कायरन पोलार्ड (वेस्ट इंडीज, ९४२५ धावा, २६७ झेल), आंद्रे रसेल (वेस्ट इंडीज, ५०६५ धावा, २७६ बळी) ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडीज, ४४० बळी), राशिद खान (अफगाणिस्तान, २७२ बळी), लसिथ मलिंगा (श्रीलंका, ३३५ बळी), जसप्रीत बुमराह (भारत, १७४ बळी)