भारतीय महिला संघाच्या इंग्लंड दौर्यासाठी हॉकी इंडियाने काल शुक्रवारी १८ सदस्यीय संघाची घोषणा केली. राणी रामपालकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. २७ सप्टेंबरपासून सुरू होणार्या या दौर्यात भारतीय संघ पाच सामने खेळणार आहे. अनुभवी गोलरक्षक सविता हिच्याकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. जपानमधील ऑलिम्पिक टेस्ट इव्हेंटमध्ये खेळलेल्या रजनी इटिमारपू हिने संघातील स्थान राखले आहे.
भारतीय संघ ः गोलरक्षक ः सविता, रजनी इटिमारपू, बचावपटू ः दीप ग्रेस इक्का, गुरजीत कौर, रिमा खोकर, सलिमा टेटे, मध्यरक्षक ः सुशीला चानू पुखरामबाम, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल, लिलिमा मिन्झ, नमिता टोप्पो, आघाडीपटू ः राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी, नवज्योत कौर व शर्मिला देवी.