महिला कॉंग्रेसकडून ‘स्त्री’ हेल्पलाईन सुरू

0
15

गोवा महिला कॉंग्रेसने महिलांसाठी खास ‘स्त्री’ हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनचे उद्घाटन गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्या हस्ते काल करण्यात आले. गोवा महिला कॉँग्रेसच्या १८००-२०३-०५८९ या क्रमांकावर संपर्क साधून महिला आपल्या समस्या मांडू शकतात, असे महिला विभागाच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी सांगितले.