महिलांची गगनभरारी

0
203
  • सुधाकर रामचंद्र नाईक

नव्या सहस्रकात भारतीय कन्यकांनी क्रीडाक्षेत्रातही उत्तुंग झेप घेतली असून आंतरराष्ट्रीय महिलादिनाचे औचित्य साधून विविध क्रीडाप्रकारांत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला गौरव प्राप्त करून दिलेल्या भारतीय महिलांच्या कामगिरीचे गुणावलोकन…

जीवनात विविध भूमिका अगदी सहजपणे वठवीत महिला समाजमनाचा आधारस्तंभ बनत चालल्या आहेत. कधी वात्सल्यमूर्ती माता, प्रेमळ कन्या, भावासाठी जीव ओवाळणारी बहीण, कर्तव्यदक्ष गृहिणी, सक्षम सहचारिणी अशा विविध भूमिका अत्यंत समर्थपणे निभावणारी भारतीय स्त्री आता पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडवीत विविध क्षेत्रांत अग्रेसर ठरत आहे. नव्या सहस्रकात भारतीय कन्यका-महिलांनी क्रीडाक्षेत्रातही उत्तुंग झेप घेतली असून आंतरराष्ट्रीय महिलादिनाचे औचित्य साधून विविध क्रीडाप्रकारांत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला गौरव प्राप्त करून दिलेल्या भारतीय महिलांच्या कामगिरीचे गुणावलोकन करणे इष्ट ठरावे.

क्रिकेट, ङ्गुटबॉल, हॉकी, कबड्डी आदी सांघिक खेळांबरोबरच भारत्तोलन, जलतरण, मुष्टियुध्द, टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, जिम्नॅस्टिन, ऍथलेटिक्स, स्कवॅश, तिरंदाजी, नेमबाजी आदी विविध क्रीडाक्षेत्रांत भारतीय महिलांनी अजोड कामगिरी बजावीत भारत देशाची शान उंचावलेली आहे. २००० मधील सीडनी ऑलिंपिकमध्ये महिला भारत्तोलनपटू कर्नाम मल्लेश्‍वरीने कांस्य पदक जिंकून भारतीय महिला क्रीडाविश्‍वाला नवी उंची गाठून दिली. जागतिक स्तरावरील सर्वोच्च प्रतियोगिता गणल्या जाणार्‍या ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनण्याचा मान मल्लेश्‍वरीने मिळविला आणि तिच्यापासून प्रेरणा घेत अनेक नैपुण्यकुशल महिला क्रीडापटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गगनभरारी घेतली. आंतराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिला स्पर्धकांनी सुमारे २०० हून अधिक सुवर्णांसह सातशेहून अधिक आंतरराष्ट्रीय पदके मिळविलेली आहेत. एमसी मेरी कोम, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, पी. व्ही. सिधू, मिताली राज, साक्षी मलिक, दीपा कर्माकर, तानिया सचदेव, राणी रामपाल, दीपिका पलिक्कल तसेच गोव्याच्या योलांदा डिसौझा, अनुरा प्रभुदेसाई, भक्ती कुलकर्णी, शिखा पांडे आदींसह अनेक नैपुण्यकुशल भारतीय महिला क्रीडापटूंनी आपल्या क्रीडागुणांचे अजोड दर्शन घडवीत देशाचे नाव उंचावले.
एमसी मेरी कोम (बॉक्सिंग) : सहा वेळच्या वर्ल्ड ऍमॅच्युअर बॉक्सिंग विजेत्या मेरी कोमने एकंदर जीवनसंघर्ष आणि अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करीत मिळविलेले विलक्षण यश ही खरोखरच शौर्यगाथाच ठरावी. २०१४ मधील इंचेऑन एशियन गेम्समध्ये बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला स्पर्धक बनण्याचा मान मिळविलेल्या मेरी कोमने सात वर्ल्ड ऍमॅच्युअर बॉक्सिंंग प्रतियोगितांतील सहभागात प्रत्येक वेळी पदक जिंकण्याचा पराक्रम नोंदलेला आहे. या कामगिरीमुळेच मेरी कोम पद्मश्री, पद्मविभूषण, राजीव गांधी खेल रत्न आदी मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांची मानकरी ठरली असून ती विद्यमान राज्यसभा सदस्य (खासदार) आहे.

सानिया मिश्रा (टेनिस) : अवघ्या १६व्या वर्षी व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केलेल्या हैदराबादच्या सानिया मिर्झाने अल्पावधीत आपल्या खेळाची चुणूक आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्जळविताना महिला टेनिस दुहेरी आणि मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन, अमेरिकन ओपन आदी प्रमुख जागतिक स्पर्धांत श्रेष्ठत्व प्रस्थापिताना सहा प्रमुख जेतेपदे (महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीत प्रत्येकी तीन) जिंकतानाच सलग ९१ आठवडे जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी वीराजमान होण्याचा अजोड पराक्रमही गाजविला. सानिया या अचाट कामगिरीवर पद्मश्री, पद्मभूषण, राजीव गांधी खेळ रत्न आदी बहुमानीत किताबांची मानकरीही ठरली आहे.

मिताली राज (क्रिकेट) : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली ही आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा नोंदणारी तथा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ हजार धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू होय. भारतीय संघाला दोन विश्‍वचषक स्पर्धांची अंतिम ङ्गेरी गाठून देणारी मिताली ही भारताची महिला विभागातील एकमेव कर्णधार होय. अर्जुन, पद्मश्री आदी विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची ती मानकरी ठरली.

सायना नेहवाल (बॅडमिंटन) : बॅडमिंटनमध्ये भारताला पहिले ऑलिंपिक पदक जिंकून देणार्‍या सायना नेहवालला खर्‍या अर्थाने हा खेळ भारतीय महिलांत लोकप्रिय बनविण्याचे श्रेय द्यावे लागेल. बॅडमिंटनमधील जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविणारी पहिली भारतीय कन्यका तथा दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू नेहवालने आपल्या कारकिर्दीत ऑलिंपिकसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या असून अर्जुन, पद्मश्री, पद्मभूषण आदी विविध राष्ट्रीय पुरस्कारांची ती मानकरी ठरली आहे.

गीता ङ्गोगोट (कुस्ती) : पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्ती स्पर्धेत गीता ङ्गोगोटने नवा पायंडा पाडताना २०१० मधील राष्ट्रकूल मेळ्यात सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय कुस्तीपटू बनण्याचा पराक्रम केला. एशियन चँपियनशीप, वर्ल्ड चँपियनशीपमध्ये प्रभावी कामगिरी बजावलेली गीता २०१२ मधील समर ऑलिंपिकमध्ये पात्र ठरली होती, पण पदकप्राप्ती होऊ शकली नाही.

साक्षी मलिक (कुस्ती) : २०१६ मधील रिओ ऑलिंपिकमध्ये भारताची पदकतृषा संपविताना साक्षी मलिकने भारताची बूज राखली. रिओ दी जानैरोमधील समर ऑलिंपिकमध्ये भारतीय पथकाची मोहीम विनापदक संपणार अशी साशंका भेडसावत असतानाच, १२ व्या वर्षी कुस्तीचे क्षेत्र निवडलेल्या साक्षीने ५८ कि.ग्रॅ. गटात कांस्यपदक जिंकले. या ऑलिंपिकमध्ये भारताला दोन पदके मिळाली आणि त्यात साक्षीचे योगदानही होते. एशियन ज्युनियर, वर्ल्ड ज्युनियर चँपियनशीप, एशियन्स गेम्स, कॉमनवेल्थसह विविध स्पर्धांत पदके जिंकलेल्या साक्षीला अर्जुन, पद्मश्री, पद्मविभूषण, राजीव गांधी खेळ रत्न आदी विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले.
पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन) : सायना नेहवालचा वारसा पुढे चालविताना पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटन विश्‍वात आपल्या देदीप्यमान कामगिरीचे दर्शन घडवीत २१व्या वर्षी ऑलिंपिक रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू बनण्याचा मान मिळविला. वर्ल्ड चँपियनशीप, उबर कप, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स आदी विविध स्पर्धांत आपल्या नैपुण्यकौशल्याने भाताची शान उंचावलेली सिंधू, क्रीडा क्षेत्रातील बहुमानित अर्जुन, पद्मश्री, पद्मभूषण, राजीव गांधी खेळरत्न पुरस्कारांची मानकरी ठरली.

दीपा कर्माकर (जिम्नॅस्टिक) : २०१६ मधील समर ऑलिंपिकमध्ये थोडक्याने पदक हुकलेल्या दीपा कर्माकरने महिलांच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टमध्ये एशियन चँपियनशीप, कॉमनवेल्थ गेम्स, एङ्गआयजी वर्ल्ड कप, एङ्गआयजी वर्ल्ड चॅलेंज कप आदी स्पर्धांत भारताचे प्रतिनिधित्व करतानाच विलक्षण कामगिरीसह पदकेही जिंकली. अर्जुन, पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न आदी क्रीडाक्षेत्रातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारची ती मानकरी होय.
राणी रामपाल (हॉकी) : अवघ्या पंधराव्या वर्षी २०१० मधील वर्ल्ड कपमध्ये भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणारी युवा महिला हॉकीपटू बनण्याचा मान राणी रामपालला मिळाला. चँपियन चॅलेंज स्पर्धेत तिने ‘टॉप गोलस्कोअरर’ आणि ‘यंग प्लेयर ऑङ्ग दी टुर्नामेंट’ किताब मिळविले. २००९ पासून एशियन गेम्स, ज्यीनियर वर्ल्ड कप आदी प्रमुख स्पर्धांसह २२६ सामन्यांत भारतीय महिला हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केलेली राणी रामपाल ही पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न आदी बहुमानित राष्ट्रीय किताबांची मानकरी ठरली.

दीपिका पलल्लीकल (स्क्वॉश) : पीएसए वूमेन्स रँकिगमध्ये ‘टॉप टेन’ मानांक मिळविलेली दीपिका ही भारताची प्रमुख महिला स्क्वॅशपटू होय. दीपिकाने एशियन गेम्ससह डब्ल्यूआयएसपीए वुमेन्स इंटरनॅशनल स्क्वॅश प्लेयर असोसिएशन स्पर्धांत अनेक जेतेपदे मिळविताना कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्तरावर १३व्या क्रमापर्यंत झेप घेतली. दीपिकाने या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसह अर्जुन, पद्मश्री आदी बहुमानित किताबांचा मान मिळविला आहे.
योलांदा डिसौझा (ङ्गुटबॉल) : ‘दी मारादोना ऑङ्ग गोवा’ आणि ‘इटरनॅशनल हॅट्‌ट्रिक क्वीन’ म्हणून नामना मिळविलेली गोमंतकीय महिला ङ्गुटबॉलपटू योलांदाने ७० ते ८० दशकांच्या अखेर आणि प्रारंभिक कालखंडात भारतीय ङ्गुटबॉल संघाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले. १९७६ मध्ये स्वीडिश क्लब बीइटी विरुध्दच्या सामन्यात योलांदाने हॅट्‌ट्रिक नोंदवीत ‘हॅट्‌ट्रिक क्वीन’चा मान मिळविला होता. १९८० मध्ये योलांदाला इंडियन वुमेन्स ङ्गुटबॉल ङ्गेडरेशनतर्ङ्गे ‘प्लेयर ऑङ्ग दी डिकेड’ किताबाने सन्मानित केले गेले.

भक्ती कुलकर्णी (बुद्धिबळ) : गोव्याची पहिली वूमन ग्रँडमास्टर तथा वूमन इंटरनॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णीला गोमंतकीय महिलांत बुध्दिबळाची आवड निर्माण करण्याचे श्रेय जाते. बालपणापासून बुध्दिबळाची आवड जपलेल्या भक्तीने २०११ मध्ये एशियन ज्युनियर चेस चँपियनशीप जिंकली. २०१३ मध्ये झेक रिपब्लिक येथे झालेल्या इंटरनॅशनल वुमेन्स चेस चँपियनशीप आणि २०१६मध्ये एशियन चेस चँपियनशीपचे जेतेपद मिळविले. २००९ पासून विविध स्पर्धार्ंंत भक्तीने राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

शिखा पांडे (क्रिकेट) : फ्लाइट लेफ्टनंट शिखा सुभाष पांडे ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिली गोमंतकीय महिला क्रिकेटपटू. २००४ पासून गोवा क्रिकेट असोसिएशनच्या महिला क्रिकेट संघातङ्गर्ंे आपले क्रिकेट नैपुण्य पर्जळविलेल्या शिखाने अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच आपली क्रिकेटची आवडही जोपासत २०१४ मध्ये भारतीय महिला संघात स्थान मिळविले. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय, टी-२० स्पर्धांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या शिखाने १०१७ मधील महिला क्रिकेट विश्‍वचषकाची अंतिम ङ्गेरी गाठलेल्या भारतीय संघाचे, तसेच २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या आयसीसी वूमेन्स टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

आंतरराष्ट्रीय महिलादिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय क्षितिजावर भारतीय तिरंगा अभिमानाने उंचावलेल्या महिला क्रीडापटूंच्या कर्तृत्वाचा आलेख एवढ्यात संपणार नाही तर युवा महिला क्रीडापटू नव्या ध्येयाने तो अधिक उंच उंचावण्याचा प्रयत्न निरंतर करतील अशी आशा आहे.