>> रुद्रेश्वर पणजीला पाच प्रथम बक्षिसे
५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रुद्रेश्वर पणजी या संस्थेच्या ‘पालशेतची विहीर’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. स्पर्धेचा निकाल सांस्कृतिक कार्य संचालनालयाने जाहीर केला आहे. रुद्रेश्वर पणजीने दिग्दर्शनाचे प्रथम (दीपक आमोणकर), नेपथ्य प्रथम- योगेश कापडी, प्रकाश योजना प्रथम – सतीश नार्वेकर, रंगभूषा प्रथम-एकनाथ नाईक, संगीत दिग्दर्शन प्रथम – नितेश नाईक, उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक – सिद्धी उपाध्ये अशी वैयक्तिक पारितोषिकेही पटकाविली आहेत.
स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक लोकरंगभूमी, सांगलीच्या पूर्णविराम तर तृतीय पारितोषिक नाट्यभारती, इंदोरच्या ‘मॉर्फोसिस’ नाटकाला प्राप्त झाले आहे.
दि. ३ व ४ फेबु्रवारी रोजी डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाट्यगृह, औरगांबाद आणि तापडिया नाट्यगृह, औरगांबाद येथे झालेल्या अंतिम फेरीत ४६ नाट्यप्रयोग सादर झाले. परीक्षक म्हणून भालचंद्र पानसे, सुरेश गायधनी, अरुण मेहता, संजय पेंडसे व विजय शिरोळे यांनी काम पाहिले.