महाराष्ट्रात १८ बाधितांपैकी ८ जणांची चाचणी निगेटिव्ह

0
7

महाराष्ट्रात ओमिक्रॉन या नवीन विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत असतानाच आतापर्यंत राज्यात १८ रुग्ण ओमिक्रॉनबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी ९ रुग्णांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादूर्भाव वाढत आहे.

नागपूरमध्ये काल रविवारी पहिला ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळला. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉनबाधितांचा आकडा १८ वर पोहोचला आहे. मात्र ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या १८ रुग्णांपैकी ९ रुग्णांना आतापर्यंत रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.