महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून मध्य प्रवेशमध्ये प्रवेश करणार्या प्रवाशांना आठवडाभर विलगीकरणात राहावे लागेल. तसे आदेश मध्य प्रदेश सरकारने जारी केले आहेत. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढू लागल्याने मध्य प्रदेश सरकारने हे निर्देश लागू केले आहेत. महाराष्ट्रातील नागपूरसह विविध शहरांत कोरोनाची दुसरी लाट उसळताना सध्या दिसत आहे.