मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचार दौर्यावर काल रवाना झाले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कोल्हापूर येथे भाजपचे उमेदवार अमोल महाडिक यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त आयोजित युवा संवादात सहभाग घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी इंचलकरंजी येथे कॉफी विथ युथ या प्रचार कार्यक्रमात सहभाग घेतला. मुख्यमंत्री डॉ. सावंत सांगली, सातारा, कराड आदी भागातील भाजपच्या प्रचार सभांत सहभागी होणार आहेत. तसेच मुंबईमध्ये स्थायिक मूळ गोमंतकीय नागरिकांशी संवाद साधणार आहेत.