‘आजादी का अमृतमहोत्सव’निमित्त ईडन गार्डन येथे १६ सप्टेंबर रोजी इंडिया महाराजा व वर्ल्ड जायंट्स यांच्यात मित्रत्वाचा सामना खेळविला जाणार आहे. या विशेष सामन्याद्वारे लिजंडस लीग क्रिकेटची सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक व लिजंड्स लीग क्रिकेटचे कमिशनर रवी शास्त्री यांनी या सामन्याची माहिती दिली. या सामन्यात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना तब्बल सात वर्षांनंतर खेळताना पाहण्याची संधी क्रिकेटच्या चाहत्यांना मिळणार आहे. २०१५ साली गांगुली यांनी लिजंड्स स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
इंडिया महाराजा संघ ः सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, सुब्रमण्यम बद्रिनाथ, इरफान पठाण, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंत, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजय जडेजा, आरपी सिंग, जोगिंदर शर्मा, व रितिंदर सिंग सोधी.
वर्ल्ड जायंट्स ः ऑईन मॉर्गन, लेंडल सिमन्स, हर्षल गिब्ज, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मॅक्कलम, जॉंटी र्होड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मासाकाद्झा, मश्रफे मोर्तझा, असगर अफगाण, मिचेल जॉन्सन, ब्रेट ली, केव्हिन ओब्रायन व दिनेश रामदिन.