>> ८० जण ढिगार्याखाली
रायगड जिल्ह्यातील महाड येथे एक पाचमजली इमारत काल मुसळधार पावसात कोसळली. या इमारतीच्या ढिगार्याखाली किमान सत्तर ते ऐंशी जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या इमारतीच्या ढिगार्याखाली दीडशे ते दोनशे जण अडकले असण्याची शक्यता वर्तवली आहे.
महाडच्या काजळपुरा येथील तारीक गार्डन नामक ही इमारत संध्याकाळी सहाच्या सुमारास कोसळली. इमारतीतीत दहा ते पंधरा लोकांनी बाहेर धाव घेतल्याने ते बचावले. अग्निशामक दलाच्या चार पथकांनी तातडीने स्थानिक नागरिकांनिशी मदतकार्य सुरू केले आहे. जखमींना व मृतांना बाहेर काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.