अतिरेक्यांकडून देशाच्या विविध भागात हल्ल्यांच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातीलही महत्त्वाच्या भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून सचिवालयात तसेच विधानसभा भवनात येणार्यांची कसून तपासणी केली जात आहे.
कदंब बस स्थानके, रेल्वे स्थानके, विमानतळ, किनारी भागात तसेच बाजारपेठांतही पोलीस कुमक वाढविण्यात आली आहे. दिवाळीच्या सणामुळे बाजारात गर्दी असते. पोलीस अशा ठिकाणी त्यावर नजर ठेऊन आहेत. खास गोव्यासाठीच असा सतर्कतेचा इशारा नसून नेहमीप्रमाणेच सर्वच भागात गृहमंत्रालयाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. राज्याच्या चेक नाक्यांवरही वाहनांची कसून तपासणी सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सध्या पर्यटन हंगाम असल्याने वाहनांच्याही संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनाही वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते.