मरिनाला कॉंग्रेसचा विरोध

0
118

नावशी येथील प्रस्तावित मरिना प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध असून कॉंग्रेस पक्ष या लोकांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे काल कॉंग्रेसच्या प्रवक्त्या स्वाती शेट केरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

या मरिनामुळे स्थानिकांची लाखो चौ. मी. जमीन हडप करण्यासह सुमारे अडीचशे बोटींची ये-जा होणार असल्याने किनार्‍याजवळ समुद्राचा भागही या जहाजांनी व्यापला जाणार असल्याचे केरकर म्हणाल्या. या मरिनामुळे ताळगाव, सांताक्रुझ, सांतआंद्रें, दाबोळी व कुठ्ठाळी येथील जनजीवनावर परिणाम होणार आहे. स्थानिक मच्छिमारांना मच्छिमारी करता येणार नसल्याने त्यांच्या उपजीवीकेवर परिणाम होणार असल्याचे केरकर म्हणाल्या.

मरिनासंबंधी २ नोव्हेंबरला
होणार जनसुनावणी
नावशीतील प्रस्तावित मरिना प्रकल्पासंबंधी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने येत्या २ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुनावणी ठेवली आहे. ही सुनावणी ताळगाव येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिएम येथे २ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वा. सुरू होणार असून ती संध्याकाळी ७ वा. संपणार आहे.
या सुनावणीत भाग घेऊ इच्छिणार्‍यांसाठी सकाळी ९.३० वा. नोंदणी सुरू होणार आहे.