मराठी, कोकणीतून येणाऱ्या पत्रांना त्याच भाषेतून उत्तर द्या

0
6

>> राज्य सरकारचे सर्व सरकारी खाती, स्वायत्त संस्थांना निर्देश

मराठी किंवा कोकणी भाषेतून येणाऱ्या पत्रांना त्याच भाषेतून उत्तर देण्याचा निर्देश राज्य सरकारने सर्व सरकारी खाती, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सरकारी अनुदान प्राप्त संस्थांना दिला आहे.

राज्य सरकारच्या राजभाषा संचालनालयाचे संचालक प्रशांत शिरोडकर यांनी यासंबंधीचे एक परिपत्रक 4 नोव्हेंबर रोजी जारी केले आहे. राज्य सरकारच्या खात्यांकडून नागरिकांच्या मराठी किंवा कोकणी भाषेतील पत्रांना त्याच भाषेतून उत्तर दिले जात नव्हते. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी मराठी आणि कोकणी भाषेतून येणाऱ्या पत्रांना त्याच भाषेतून उत्तर देण्याचा निर्देश दिला होता. ह्या निर्देशानुसार राजभाषा संचालनालयाने खास परिपत्रक जारी करून सरकारी खात्यांचे विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, शैक्षणिक संस्था, सरकारी संस्था, स्वायत्त संस्था, सरकारी कंपन्या किंवा 100 टक्के सरकारी अनुदान प्राप्त संस्थांनी मराठी किंवा कोकणी भाषेतून येणाऱ्या पत्रांना त्याच भाषेतून उत्तर दिले जाईल, याची खबरदारी घ्यावी, असे जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.