पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात देशवासियांना संबोधित केले. समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखले जाणारे टुरिस्ट हब गोवा आज आणखी काही कारणांमुळे चर्चेत आहे. त्याला कारण आहे पणजीत आयोजित पर्पल फेस्ट. मला खात्री आहे की अशा मोहिमा आपल्या सुलभ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी खूप पुढे घेऊन जातील. पर्पल फेस्ट यशस्वी करण्यात ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. यावेळी त्यांनी पद्म पुरस्कार विजेत्यांच्या जीवनकथा सांगितल्या आणि लोकांना त्यांच्या प्रेरणादायी जीवनकथा वाचण्याचे आवाहन केले. यासोबतच लोकशाही आपल्या नसात आहे, ती आपल्या संस्कृतीत आहे, असेही ते म्हणाले.