मनोहर विमानतळावरून अबूधाबीपर्यंत विमानसेवा

0
20

मोपा-पेडणे येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते अबूधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत इंडिगोची थेट विमानसेवा शनिवार दि. 2 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबूधाबीला जाणारे इंडिगोचे विमान शनिवार 2 सप्टेंबर रोजी 00.25 वाजता उड्डाण करणार असून, अबूधाबीला पहाटे 02.15 वाजता पोहोचेल. तसेच, अबूधाबीहून परतीचे इंडिगो फ्लाइट पहाटे 03.15 वाजता उड्डाण करेल आणि मोपा येथे सकाळी 8.10 वाजता उतरेल. ही सेवा आठवड्यातून सोमवार, गुरुवार आणि शनिवारी असे तीन दिवस उपलब्ध होणार आहे.