मनोहर पर्रीकरांनी पुन्हा  गोव्यात यावे : उपमुख्यमंत्री

0
114

केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पुन्हा गोव्यात यावे अशी काही कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु पर्रीकर यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना येथे येणे कठीण आहे. असे असले तरी जनतेच्या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसौझा यांनी काल सांगितले.जिल्हा पंचायत निवडणूक रिंगणात उतरताना आपल्या पक्षाने अ, ब आणि क अशा पद्धतीने मतदारसंघांचे वर्गीकरण केले होते. ‘अ’ वर्गात समावेश असलेले मतदारसंघ ‘क’ वर्गात कसे आले, याचा अभ्यास करावा लागेल, असे डिसौझा यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
स्वाईन फ्लू रोगावर उपचार करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्था आहे. काही रुग्ण खाजगी इस्पितळांतून अखेरच्या क्षणी गोमेकॉत येत असल्याने अडचण होते. स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपचार करणे सोपे होते. सध्या रक्ताचे नमुने मणिपाल येथे पाठविण्यास सुरुवात केल्याचे डिसौझा यांनी सांगितले.