मद्य धोरण प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालय आता 13 मे रोजी सुनावणी करणार आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी, ईडीला फक्त 4 दिवसांचा वेळ देत आहे. मी हे प्रकरण सोमवार 13 मे रोजी ठेवत आहे. या जामीन अर्जावर आता 13 मे रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले. यापूर्वी 3 मे रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ईडी-सीबीआयला नोटीस बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले होते. सिसोदिया यांना त्यांची आजारी पत्नी सीमा यांना आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगीही देण्यात आली होती. सुमारे 8 तासांच्या चौकशीनंतर 26 फेब्रुवारी 2023 रोजी मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली होती.