मनपा कर्मचार्‍यांचा उपायुक्तांना घेराव

0
79

पणजी महापालिकेतील सेवेतून बडतर्फ केलेल्या पाच कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी काल सकाळी महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी उपआयुक्त सुधीर केरकर यांना घेराव घातल्यावर वातावरण तंग झाले. वरील कर्मचार्‍यांना गेल्या जूनमध्ये सेवेतून काढून टाकले होते. उपआयुक्तांनी त्यांना सेवेत सामावून घेण्याचे आश्‍वासन दिले होते. दि. ५ जूनपासूनच त्यांना सेवेत घ्यावे तसे न केल्यास त्यांच्या ज्येष्ठतेवर परिणाम होईल, असे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.