मध्य प्रदेशमध्ये पुरामुळे १२०० खेड्यांना फटका

0
59

मध्य प्रदेशात पूरपरिस्थिती गंभीर झाली असून राज्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा १२०० हून अधिक खेड्यांना फटका बसला आहे. पुरामुळे ५९५० लोकांना लष्कर, एनडीआरएफ, सीमा सुरक्षा दल व राज्य यंत्रणांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली.

काही लोक अजूनही पूरग्रस्त भागांमध्ये अडकून पडले असून त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. पावसाच्या प्रकोपामुळे शिवपुरी व ग्वाल्हेरदरम्यानची रेल्वे सेवा आणि मुरैना जिल्ह्यातील दूरसंचार सेवा ठप्प झाल्या असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा हवाई दौरा केला.