मध्यप्रदेशात ‘बुराडी’ प्रकरणाची पुनरावृत्ती

0
8

दिल्लीतील बुराडी येथे 6 वर्षांपूर्वी एकाच कुटुंबातील 11 सदस्यांच्या सामूहिक मृत्यूची घटना घडली होती. या घटनेने दिल्लीसह संपूर्ण देश हादरला होता. आता तशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. काल सकाळी हा प्रकार उघडकीस आला. मध्य प्रदेशच्या अलीराजपूर येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांंचे मृतदेह छताला लटकल्याचे आढळून आले. पती-पत्नी आणि त्यांच्या तिन्ही मुलांचे मृतदेह घरात आढळले आहेत.

सहा वर्षांपूर्वी 1 जुलै 2018 रोजी बुराडी येथे एकाच कुटुंबातील 11 सदस्यांनी सामूहिक आत्महत्या केली होती. अलीराजपूरमधील प्रकरण त्याच घटनेची पुनरावृत्ती असल्याचे बोलले जात आहे. अलीराजपूर जिल्ह्यातील सोंडवा पोलीस ठाण्यांतर्गत रावडी गावात ही घटना घडली आहे. मृतांमध्ये कुटुंबप्रमुख राकेश, त्यांची पत्नी ललिता, मुलगी लक्ष्मी आणि दोन मुले अक्षय व प्रकाश यांचा समावेश आहे. या कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी ही सामूहिक आत्महत्या नसून हत्याकांड असल्याचा संशय व्यक्त केला आहे.