मत्स्योत्पादन योजना अधिसूचित

0
97

मच्छिमारी खात्याने राज्यात ऍक्वा कल्चरच्या माध्यमातून मत्स्य उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी दोन योजना अधिसूचित केल्या आहेत. केंद्र सरकारकडून मत्स्य उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी नील क्रांती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेखाली मत्स्य उत्पादनात वाढ करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.

मच्छिमारी खात्याने ‘ओपन सी केज कल्चर’ ही एक योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेणार्‍याला खुल्या गटातील व्यक्तीला निर्धारीत खर्चाच्या ४० टक्के अनुदान दिले जाणार आहे. व्यक्तीला स्वतःची ६० टक्के रक्कम गुंतवावी लागणार आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी ६० टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठीच्या अनुदानाचा केंद्र सरकार ६० टक्के आणि राज्य सरकार ४० टक्के भार उचलणार आहे. साधारण ५ लाख रूपयांच्या केजसाठी खुल्या गटासाठी २ लाख रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे.