मणिपूर वर्षभरापासून शांततेची वाट पाहतोय : मोहन भागवत

0
10

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली.
सोमवारी नागपुरात आयोजित कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोप समारंभात भागवत यांनी मणिपूर मुद्द्यावर भाष्य केले. मणिपूर गेल्या एक वर्षापासून शांततेची वाट पाहत आहे. गेल्या 10 वर्षांपासून राज्यात शांतता होती, मात्र अचानक तेथे बंदूक संस्कृती वाढली. येथील समस्या प्राधान्याने सोडवणे गरजेचे आहे, असे भागवत म्हणाले. निवडणुकीच्या चर्चेपासून दूर जाऊन देशाच्या समस्यांचा विचार केला पाहिजे, असे म्हणत एकप्रकारे त्यांनी मोदी सरकारलाही कानपिचक्या दिल्या. निवडणूक प्रचारादरम्यान आपण ज्या प्रकारे एकमेकांचा अपमान करतो, तंत्रज्ञानाचा गैरवापर करतो आणि खोटे पसरवतो ते योग्य नाही. विरोधकांना विरोधक म्हणू नये, असेही भागवत म्हणाले.