अमित शहा, राजनाथ सिंह यांच्याकडून स्पष्ट
मणिपूरमधील दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. विरोधकांनी मणिपूरमधील हिंसाचार आणि महिलांवर झालेला अत्याचार या घटनांवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. त्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमधील घटनेचे सत्य सर्वांसमोर येणे गरेजेचे आहे. आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचे संसदेत सांगितले.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारला घेरले. त्यानंतर काल 24 जुलै रोजी विरोधकांनी मोदी सकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. त्यावेळी अशा गंभीर मुद्द्यावर आम्ही चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे गृहमंत्री शहा तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
लोकसभेत बोलताना विरोधकांनी या मुद्द्यावर चर्चा करावी. आम्ही तयार आहोत. असे शहा यांनी सांगितले. तरीदेखील विरोधकांनी आपली घोषणाबाजी चालूच ठेवली. त्यानंतर लोकसभचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. राजस्थान आणि पश्चिम बंगालमधील महिला अत्याचारावरही चर्चा होणे गरजेचे आहे असे भाजपच्या नेत्यांनी काल संसदेत सांगितले.