मणिपूरच्या राजधानीत स्फोटात १ ठार, ५ जखमी

0
97

मणिपूरची राजधानी असलेल्या इंफाळच्या मध्यवस्तीत काल झालेल्या एका बॉम्बस्फोटात एक जण ठार, तर पाच जण जखमी झाले. सकाळी ११.१० वाजता हा स्फोट झाला. इंफाळच्या थंगल बाजार एमजी अव्हेन्यू या गजबजलेल्या भागात हा स्फोट झाला. तेथून अवघ्या १०० मीटरवर पोलीस स्थानक आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री ओ इबोबी सिंग यांनी या स्फोटाचा निषेध केला आहे. अशाच प्रकारचा एक स्फोट गेल्या एक ऑक्टोबरला दुर्गा पूजा उत्सवात झाला होता, ज्यात काही लोक जखमी झाले होते.