मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

0
3

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी काल रविवार दि. 9 रोजी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे सुपूर्द केला आहे. नवीन मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय एक-दोन दिवसांत घेतला जाईल. राज्यपालांनी त्यांना नुकतेच हंगामी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यास सांगितले आहे. गेल्या दीड वर्षापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असून गेल्या वर्षाच्या अखेरीस मुख्यमंत्री सिंह यांनी मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल जनतेची माफी मागितली होती. ते म्हणाले होते की, हे संपूर्ण वर्ष खूप वाईट गेले. गेल्या वर्षी 3 मे पासून आजपर्यंत जे काही घडले त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागतो. राज्यातील अनेकांनी आपल्या कुटुंबियांना आणि आप्तस्वकियांना गमावले आहे. राज्यातील अनेक लोकांना स्वत:चे घर सोडावे लागले आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून राज्यात शांततापूर्ण वातावरण आहे. मला आशा आहे की, 2025 मध्ये राज्याची स्थिती पूर्ववत होईल.