मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला

0
4

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर काल अतिरेक्यांनी हल्ला केला. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारावेळी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला. काल सकाळी 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. हा ताफा इम्फाळहून जिरीबाम जिल्ह्यात जात असताना राष्ट्रीय महामार्ग-37 वर हा हल्ला करण्यात आला.

6 जून रोजी अज्ञात हल्लेखोरांनी जिरीबामध्ये एका समाजातील 59 वर्षीय व्यक्तीची हत्या केली होती, तेव्हापासून जिरीबाममध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर या भागातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह सोमवारी जिरीबाममध्ये दाखल होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा ताफा राष्ट्रीय महामार्ग-37 वर असताना त्यावर हल्ला करण्यात आला.