मणिपुरात कुकी अतिरेक्यांकडून पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला

0
5

कुकी अतिरेक्यांनी काल रविवारी (14 जुलै) मणिपूरच्या जिरीबाममध्ये सीआरपीएफ आणि पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला. यामध्ये सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. यात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. पोलिसांनी सांगितले की, कुकी अतिरेक्यांनी मोंगबुंगमधील डोंगराळ भागातून गोळीबार केला. सीआरपीएफ जवान अजय कुमार झा यांच्या डोक्याला गोळी लागली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मोंगबुंगमध्ये शनिवारी रात्री उशिरा गोळीबार सुरू झाला होता. सीआरपीएफ आणि पोलिसांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले नाही.