मडगाव स्मशानभूमीत दोघांवर प्राणघातक हल्ला, सातजणांना अटक

0
18

>> शहाळी टाकताना जाब विचारल्याने हल्ला

मठग्रामस्थ हिंदू सभेच्या पाजीफोंड येथील हिंदू स्मशानभूमीत काल रविवारी सायंकाळी शहाळ्यांचा कचरा टाकताना रंगेहाथ पकडून जाब विचारला. या प्रकरणी दवर्ली-दिकरपाली पंचायतीचे पंच साईश राजाध्यक्ष व मठग्रामस्थ हिंदू सभेचे मंडळाचे सदस्य जयवंत पै फोंडेकर यांच्यावर सातजणांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात साईश व जयवंत हे दोघेही जखमी झाले आहे. फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणी सातजणांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी विनाविलंब ही कारवाई केली. हल्ला झाल्याचे वृत्त समजताच मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष भाई नाईक घटनास्थळी पोहचले. त्याचवेळी शहाळे विक्रेते व त्यांचे साथीदार पळून गेले होते.

साईश राजाध्यक्ष हे हॉटेलमधून सायंकाळी 4.30 च्या सुमारास घरी जात होते. त्यावेळी स्मशानभूमीत शहाळी टाकत असल्याबद्दल त्यांनी जाब विचारल्यानंतर हा प्राणघातक हल्ला केला. मारहाणीचे वृत्त समाजताच मठग्रामस्त हिंदू सभेचे पदाधिकारी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस स्थानकाबाहेर जमले व पोलिसांनी तात्काळ संशयितांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी हिंदू सभेचे भाई नाईक, विश्व हिंदू परिषदेचे सहसमाजसेवक विराज देसाई, शर्मद पै रायतूरकर यांनी या घटनेचा निषेध केला व संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.