![11Bomb at the Konkan Railways Margao station0211](https://navprabha.com/wp-content/uploads/2014/10/11Bomb-at-the-Konkan-Railways-Margao-station0211.jpg)
मडगाव रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या वृत्ताने काल पोलिसांची, रेल्वे कर्मचारी व प्रवाशांची भीतीने धावपळ उडाली. काल दुपारी हे वृत्त येताच मडगाव पोलीस, रेल्वे पोलिसांनी स्टेशनवर जाऊन पहाणी केली. तसेच बॉम्ब शोधक श्वान पथक आणून सर्वत्र कसून तपासणी केली. मात्र, काही सापडले नाही व अफवा असल्याचे सिद्ध झाले. प्रवाशांच्या बॅगा व इतर सामानाची तपासणी यावेळी करण्यात आली.