मडगाव येथे परिचारिका शिक्षण संस्था पुढील वर्षी सुरू

0
92

मडगाव येथील जिल्हा इस्पितळाच्या तिसर्‍या व चौथ्या मजल्यावर परिचारिका शिक्षण संस्था उभारण्यात येणार असून जून २०१६ पर्यंत ती सुरू होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच सुपरस्पेशलिटी शिक्षणाची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निम वैद्यकीय क्षेत्रातील ५ अभ्यासक्रम सरकारने सुरू केले आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍यांना रोजगार मिळेल असे ते म्हणाले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी १५० उमेदवारांना प्रवेश मिळाला आहे. २०० जागांची व्यवस्था करण्याची तयारी आहे, असेही पार्सेकर यांनी सांगितले.