दक्षिण गोवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मडगाव नगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित राष्ट्रीय महिलादिन पालिकेच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी कामाच्या ठिकाणी महिलांचा होत असलेला लैंगिक छळ, प्रतिबंध आणि निवारण कायदा २०१३ विषयी जागृती करण्यात आली. मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी ऍड. कुलासो यांनी लोक अदालतीची उपयुक्तता, वाद निवारणासाठी मध्यस्ती व सामंजस्य या विषयावर माहिती दिली. महिला आणि बाल विकास खात्याच्या संचालक दीपाली नाईक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.