घाऊक मासळी बाजार व एसजीपीडीएच्या किरकोळ बाजारालगत व आत बेकायदेशीरपणे वस्तूंची विक्री करुन अडथळा आणणार्यांवर शुक्रवारपासून कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिकारी, मडगांव नरगपालिकेचे मुख्याधिकारी व फातोर्डा पोलिसांना दिले.
काल सकाळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घाऊक व किरकोळ मासळी बाजाराला भेट देवून पहाणी केली. त्यांनी घाऊक विक्रेते, एजंट रापणकार यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, मत्स्योद्योगमंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार विजय सरदेसाई व आमदार विल्फ्रेड डिसा उपस्थित होते.
एसपीडीएचे अध्यक्ष विल्फ्रेड डिसा यांनी घाऊक बाजारांत बसून मासळी विकतात त्यांना सकाळी ९ नंतर बसण्यास बंदी घातली आहे. त्याना किरकोळ बाजारांत जागा मिळवून देण्याचा प्रयत्न करीन असे सांगितले. घाऊक बाजारांत आत्याधुनिक बाजार इमारत बांधणीची मागणीही त्यांनी केली.