मडगाव आराखड्याला नागरिकांचा तीव्र विरोध

0
1

मडगाव मास्टर प्लॅन 2041 चे सादरीकरण काल गुरूवारी सकाळी मडगाव नगरपालिका सभागृहात करण्यात आले. त्याला अनेक बिगर सरकारी संस्था प्रतिनिधी व नागरिकांंनी तीव्र विरोध दर्शविला. पालिका क्षेत्रातील ह्या आराखड्यात अनेक त्रुटी असल्याने दाखवून दिले. हा आराखडा व बाह्य आरखडयापेक्षा वेगळा आहे. मडगावच्या बिल्डरना सुविधाजनक बनविला असल्याने लोकांसाठी खुला ठेवला नाही. नागरिकांना विश्वासात घेऊन आराखडा बनवला पाहिजे होता. पार्किंग जागा, मोकळ्या जागा, यात घोटाळा असल्याचे नागरिकांनी दाखवत या आराखड्याला तीव्र विरोध केला.