>> संशयिताला अटक
>> मडगाव पोलिसांची कारवाई
येथील मोती डोंगरावर नागेश गार्डन जवळ मडगाव पोलिसांनी छापा टाकून फैजान सैय्यद (२५) या तरूणाला ताब्यात घेतले व त्याच्याकडील ६.४२ लाखांचा गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजा २ किलो १४३ ग्राम इतका होता. इतक्या मोठ्या प्रमाणात दक्षिण गोव्यात पहिल्यांदाच गांजा जप्त करण्यात आला आहे.
फैजान सैय्यद हा कर्नाटकातील असून कित्येक काळापासून तो मडगाव व परिसरात ग्राहक तसेच एजंटाना गांजा व अमली पदार्थ पुरवित असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. काल मडगाव पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली व छापा टाकला. त्याच्याकडे २ किलो १४३ ग्राम गांजा सापडला. त्याच्याबरोबर आणखी कोण साथीदार असल्याचे समजू शकले नाही. मोती डोंगरावर अंधाराचा फायदा घेऊन तो अमलीपदार्थ विकत होता. तसेच पालिका उद्यान, समुद्र किनारे व शैक्षणिक संस्था लगत अमलीपदार्थ विकत असल्याचा पोलिसांना सुगाव लागला होता. पोलिस निरीक्षक कपील नायक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक आदिकत नाईक, सशांक साखळकर यांनी कारवाई केली.