मडगावात दगडाने ठेचून अज्ञाताचा खून

0
107

मडगाव कोकण रेल्वे स्टेशनसमोर स्काय बसच्या २५ क्रमांकाच्या खांब्याजवळ एका अज्ञात इसमाचा दगडांनी ठेचून खून केलेला केला. मृतदेह मडगाव पोलिसांना सापडला. मृतव्यक्तीचे वय ५० ते ६० वर्षे असल्याचे मडगाव पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांनी सांगितले. काल पहाटे अज्ञात इसमाने खून केलेला असावा. सिमेंटच्या विटेने व त्यानंतर लोखंडी सळईने ठेचून खून केला असावा. त्याचा चेहरा पूर्णपणे ठेचल्याने ओळखता येत नव्हता. कामगार वर्गातील दोघांचे भांडण झाले असावे व त्यातून खून झाल्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.