मडगाव (न. प्र.)
रवींद्र भवन मडगाव व एकदंताय म्युझिकल संस्था यांच्यातर्फे अखिल गोवा काराओके गायन स्पर्धा आयोजित केली असून ही स्पर्धा दि. ३ नोव्हेंबर रोजी रवींद्र भवनात होईल, अशी माहिती रवींद्र भवनचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली.
ही स्पर्धा दोन गटांतून घेण्यात येणार असून पुरुष व महिला अशा गटांतून घेण्यात येणार आहे. इच्छुकांनी दि. २५ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत नाव नोंदणी नोंदवावीत असे आवाहन केले आहे. दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्राथमिक फेरी घेण्यात येईल. त्यातून प्रत्येकी २० महिला व २० पुरुष स्पर्धकाची उपांत्य फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे. दि. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता अंतिम फेरीसाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे. त्यातून प्रत्येकी १०-१० स्पर्धकांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे व अंतिम स्पर्धा दि. ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ५.३० वाजता घेण्यात येणार आहे.
प्रत्येक विभागासाठी तीन रोखा बक्षिसे प्रमाणपत्र ठेवले आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय सर्वप्रथम विजेत्यांना रु. ५०००, रु. ३०००, रु. २००० तसेच तीन उत्तेजनार्थ बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रथम उत्तेजनार्थ १६ हजार, द्वितीय ७५० व तृतीय ५०० रुपये तसेच ‘काराओके स्टार’ ७ हजार रुपयाचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.