मडगावातील अपघातात तीन कारचे मोठे नुकसान

0
2

काल रविवारी पहाटे भरधाव व निष्काळजीपणे वाहन हाकून तीन अलिशान कारना वर्ना कारने जोराची धडक दिल्याने तिन्ही कारची मोडतोड झाली. या अपघातात लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मालभाट मडगाव या ठिकाणी घडली.

आके सनी स्टेशनरीसमोरील इमारतीखाली होंडा सिटी, डस्टर व एसएनटी या तीन कारना पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास भरवेगाने आलेल्या वर्ना कारने जोरदार धडक दिली. त्यात एसएनटी कारवर डस्टर येऊन पडली. त्यामुळे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले. एसएनटी कारचे मालक गौरंग मेहता यांचे तेथे दुकान असून त्यांनी आपली कार दुकानाजवळ ठेवली होती. वर्ना कार आके येथील अमित बोरकर यांच्या मालकीची असून त्याच्याविरोधात तक्रार नोंदविली आहे. सुदैवाने या कार अपघातातकोणतीही जिवीतहानी झाली नाही. या प्रकरणी मडगाव पोलीस तपास करीत आहेत. नुकसान झालेल्या तिन्ही कारमालकांनी तक्रार नोंदविली आहे.