दामाळ-उगे- सांगे येथील साळावली नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या मडगाव येथील दोन युवकांचे काल बुडून निधन झाले.
बोर्डा-मडगाव येथील आठ तरूणांचा एक गट दामाळ येथे नदीवर पोहण्यासाठी आला होता दुपारी अचानक आस्वीन नोरोन्हा (१८) हा युवक गटांगळ्या खात असल्याचे पाहून त्याचा साथीदार राल्फ पेरैरा (१८) पाण्यात खोलवर गेला व दोघेही बुडाले.गावच्या काही लोकांनी धांव घेऊन त्यांचे मृतदेह लगेच वर काढले. या प्रकरणाचा तपास सांगेचे उपनिरीक्षक सचीन पन्हाळकर हे निरीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत. दोघां युवकांना ज्या ठिकाणी बुडून मरण आले आहे तेथे गावचे लोक कपडे धुण्यासाठी वापर करीत असतात. त्याचप्रमाणे तेथे गणपती विसर्जनही करीत असल्याने सदर जागा पवित्र मानली जाते. असे असताना येथे सहलीसाठी येणारे तेथे मांसाहार, दारू सेवन करून धिंगाणा घालत असल्याबद्दल स्थानिकांत नाराजी आहे. हे ठिकाण पर्यटन स्थळ करण्यासही स्थानिकांचा विरोध आहे. सरपंच अमेय नाईक यांनी याला दुजोरा दिला.