फकीरबांध येथील कोरोनावरून दोन गटांत झालेल्या भांडणातून अशांतता पसरली होती. कालपासून पुन्हा तेथे शांतता निर्माण करण्यात मडगाव पोलिसाना यश आले.
शेजार्याला कोरोनाची बाधा झाल्याचा संशय व्यक्त करून आरोग्य खात्यात तक्रार केल्याने तेथे दंगल झाली होती. दोन गटांतील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली, दंडूक्याने मारहाण करून जखमी केले होते. पोलिसांनी दोन्ही गटांच्या परस्पर विरोधी तक्रार नोंदवून १० जणांवर गुन्हा नोंदवून अटक केली होती. फैजल शेख, अरिफ शेख हे फरारी होते. त्यांना काल रात्री अटक केली. या अगोदर सय्यद हुसेन, रझाणू सय्यद, मकबूल सय्यद, आयुव सैय्यद, मोहमंद इरफआन व सोहेल शेख याना अटक करून त्यांना न्यायालयात सादर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लॉकडाऊन उल्लंघनप्रकरणी
९ लाख दंड वसूल
दरम्यान, कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतर त्या नियमाचा भंग केल्यावर पोलिसांनी गुन्हे नोंद केले. दि. २५ मार्चपासून कालपर्यंत १८८ जणांवर गुन्हे नोंदवलेले व त्यांच्याकडून ८ लाख ९८ हजार दंडापोटी वसूल केले.
या काळात १२६ जणांना अटक केली, ४२ वाहने जप्त केली, तसेच वाहन नियमांचे उल्लंघन केलेल्या ४८९६ जणांकडून ९ लाख रुपये दंडापोटी वसूल केल्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी सांगितले.