मगो पक्ष एकूण १८ मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहे. त्यापैकी १२ मतदारसंघांत यापूर्वीच काम सुरू केले असल्याची माहिती मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. मगो पक्ष कोणत्याही परिस्थितीत सत्ताधारी भाजपबरोबर युती करणार नसल्याचा काल त्यांनी पुनरुच्चार केला.
पेडणे, मांद्रे, हळदोणा, म्हापसा, शिरोडा, मडकई, फोंडा, प्रियोळ, मये, सावर्डे, कुडचडे, दाबोळी या मतदारसंघांत पक्षाने यापूर्वीच आपले काम सुरू केले आहे. सांतआंद्रे, सांताक्रुझ, कुंभारजुवे, सांगे, वास्को व केपे ह्या मतदारसंघांतूनही निवडणूक लढवणार आहे. त्याशिवाय आणखी सहा मतदारसंघांतूनही निवडणूक लढवण्याबाबत पक्षाची चाचपणी सुरू आहे.
एखाद्या पक्षाबरोबर युती झाल्यास हे सहा मतदारसंघ युतीतील घटक पक्षाला दिले जाऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.