मगो निवडणुकीत उतरला नसल्याने आपले नुकसान नाही ः श्रीपाद नाईक

0
149

मगो पक्ष आता भाजप आघाडी सरकार बरोबर नसला तरी लोकसभा निवडणुकीत आपणाला कोणतेही नुकसान होणार नसल्याचे श्रीपाद नाईक यांनी काल पत्रकार परिषदेतून बोलताना स्पष्ट केले.

जर मगो पक्ष निवडणूक रिंगणात उतरला असता, तर त्याचा थोडासा फटका आपणाला बसला असता, असे नाईक यांनी यावेळी मान्य केले. सुधीर कांदोळकर यांच्यामुळे म्हापसा मतदारसंघात भाजपला थोडीशी मते गमवावी लागतील याचीही कबुली त्यांनी प्रांजळपणे दिली.

भाजपमधील पार्सेकर, आर्लेकर, मांद्रेकर यांच्यासारखे ज्येष्ठ नेते पक्षावर नाराज आहेत, त्यामुळे निवडणुकीत पक्षाचे नुकसान होणार नाही का, असा प्रश्‍न पत्रकारांनी केला असता वरील नेते हे पक्षाचे निष्ठावान नेते आहेत. त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल असे काहीही ते करणार नसल्याचे नाईक म्हणाले. गोवा फॉरवर्डचे नेते आपल्या प्रचार सभांत सहभागी होणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.