>> लवू मामलेदार यांचे आरोप तथ्यहीन
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला पाठिंबा देण्याच्या निर्णयासह सर्व निर्णय पक्षाने आमसभेला विश्वासात घेऊनच घेतले होते, असे मगोचे ज्येष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल स्पष्ट केले.
पक्षाच्या केंद्रीय समितीपेक्षा पक्षाची श्रेष्ठ असल्याचे सांगून मगोचे सरचिटणीस लवू मामलेदार यांचे आरोप निराधार असल्याचे ते म्हणाले.
मगोमध्ये ‘फॅमिली राज’ आहे व दीपक ढवळीकर यांची पक्षात एकाधिकारशाही चालू आहे या मामलेदार यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचेही ढवळीकर यांनी म्हटले आहे.
पक्षावर टीका करण्यासाठी कुणी तरी लवू मामलेदार यांना पुढे आणले असावे, असा संशयही ढवळीकर यांनी व्यक्त केला.
मामलेदार यांनी जे आरोप केले आहेत ते हल्लीच झालेल्या पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कुणीच का उपस्थित केले नाहीत, असा प्रश्नही ढवळीकर यांनी केला आहे.