पुरातत्त्व आणि पुराभिलेख खात्याला पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी १६ अर्ज मिळाले आहेत. या अर्जांची छाननी केली जात आहे. पुरावे सिध्द होणार्या मंदिरांची पुनबांधणी हाती घेतली जाणार आहे, अशी माहिती या खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल दिली. राज्य सरकारने पोर्तुगीज कालखंडात उद्ध्वस्त मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी अंदाजपत्रकात २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.