मंत्र्यावरील हल्ल्याप्रकरणी 20 जणांविरुद्ध गुन्हा नोंद

0
15

सां जुझे दी आरियाल (नेसाय) येथे सोमवारी शिवरायांचा पुतळा उभारण्यावरून झालेल्या वादावेळी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर मातीची ढेकळे व माती फेकून हल्ला केल्या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी अज्ञात 20 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काल मायणा-कुडतरी पोलिसांनी स्वत:हून या प्रकाराची दखल घेत हा गुन्हा नोंदवला. दरम्यान, धार्मिक सलोखा बिघडू नये यासाठी आपण कोणतीही तक्रार करणार नसल्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सोमवारीच स्पष्ट केले होते.
सां जुझे दी आरियाल (नेसाय) येथील बेनाभाट परिसरात सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवण्यात आला होता; मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे वातावरण बिघडले होते. सुभाष फळदेसाई हे शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करून परतत असताना काही समाजकंटकांनी त्यांच्या अंगावर मातीची ढेकळे आणि माती फेकल्याने ते किरकोळ जखमी झाले होते. आता या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात 20 इसमांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.