मंत्री सुदिन ढवळीकर विधानसभेत उपस्थित

0
163

सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी पावसाळी अधिवेशनाला तिसर्‍या दिवशी संध्याकाळच्या सत्रात उपस्थिती लावली. तसेच वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनीही अधिवेशनाला उपस्थिती लावली आहे.

सार्वजनिक बांधकाममंत्री ढवळीकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मंत्री ढवळीकर यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे मंत्री ढवळीकर यांनी पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीचे दोन दिवस अधिवेशनाला उपस्थिती लावली नव्हती. तसेच आजारी असलेले भाजपचे आमदार कार्लुस आल्मेदा पावसाळी अधिवेशनाला काल प्रथमच उपस्थित राहिले.