खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात भेट घेतली. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे मानले जात होते. मात्र नंतर श्रीपाद नाईक यांनी ही आपली पूर्वनियोजित भेट असल्याचे स्पष्ट केले.