मंत्रिमंडळ मान्यतेशिवाय वीज दरवाढ नाही

0
14

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज दरवाढीच्या प्रश्नावर निर्णय घेतला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय वीज दरवाढ केली जाणार नाही, अशी ग्वाही वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. राज्य सरकारच्या वीज खात्याने संयुक्त वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. आयोगाने काही दिवसांपूर्वी सदर वीज दरवाढीच्या प्रस्तावावर सुनावणी घेतली होती. आयोगाने वीज खात्याचा वीज दरवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यास सदर प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.